Advanced International Journal for Research

E-ISSN: 3048-7641     Impact Factor: 9.11

A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal

Call for Paper Volume 7, Issue 1 (January-February 2026) Submit your research before last 3 days of February to publish your research paper in the issue of January-February.

राजकीय सिध्दातांची व्याप्ती

Author(s) Dr. Dhumale Dhondiram Kamaji
Country India
Abstract राज्याची निर्मिती मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाली आहे. सर्वश्रेष्ठ जीवनासाठी राज्य टिकुन आहे असे अॅरिस्टॉटल यांनी म्हटले होते. हॉब्ज रूसो, मॅकेव्हीली यांनी आपल्या सामाजिक करार सिध्दातांत मानवी स्वभाव या घटकाला अधिक महत्व दिले आहे. यातून व्यक्तीवादी विचार पुढे आला आहे. या सामाजिक करारात व्यक्तीचे अधिकार व संरक्षण याला धरून सामाजिक कराराची रचना करण्यात आली आहे. व्यक्ती वर्तनाच्या अभ्यासाला आजच्या आधुनिक काळात महत्व प्राप्त झाले आहे. एकंदरीत असे म्हणता येईल की, राजकीय सिध्दातांचा मुख्य उद्देश व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे.
मनुष्य हा राज्यात राहिल्याशिवाय त्याचा सर्वांगीण विकास होणार नाही हे सत्य आहे. अॅरिस्टॉटल म्हणतो की, जो राज्यात राहात नाही तो देव असेल किंवा पशू असेल आणि पुढे तो म्हणतो मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. प्लेटोने आपल्या उपआदर्श राज्यात राज्याचे महत्वाचे घटक सांगितले आहेत. अॅरिस्टॉटलने आपल्या आदर्श राज्यात राज्याचे महत्वाचे पैलू स्पष्ट केले आहे. राज्य उदयाचे अनेक सिध्दांत राजकीय सिध्दातांत मांडले आहेत. राज्याचा उदय, विकास, अर्थ, व्याख्या, हेतू, स्वरूप, कार्य यासंबंधीचे वर्णन सिध्दांतात आढळते.
आज जगात विविध देशात दहशतवादाचे फार मोठे हल्ले होत आहेत. त्यात भारत, पाक, अमेरिका आहेत. याचा परिणाम जगात पसरत आहेत त्यामुळे जागतिक दहशतवादाच्या अभ्यासाला महत्व पटले. त्यामुळे पुढे जागतिक शांततेला महत्व प्राप्त झाले त्याला अनुसरून सिध्दातांत जागतिक शांततेचे सिध्दांत मांडले गेले.
Published In Volume 7, Issue 1, January-February 2026
Published On 2026-02-13

Share this